Thursday, July 1, 2010

Complete poem by keshavsut " Ek tutari dya maj aanun "

One of the rarest poem to locate on internet..

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समते चा ध्वज उंच धारा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर

11 comments:

Aniket Awati said...

thanx dude!! was searching for it

Gauri Shevatekar said...

धन्यवाद निषाद ! अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण अशी ही कविता आहे. एकोणिसाव्या शतकात भारतात होत असलेल्या वैचारिक क्रांतीची आणि सुधारणांची द्योतक. इथे सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. :)

Nishad Kulkarni said...

धन्यवाद :)

Unknown said...

Very good poem .... It motivates me during tough times... :)

KC said...

hats off to keshavsut.

NK said...

How i can Get Audio of this???

mumbaikar said...

There are three more stanzas in original poem.
नियमन मनुजासाठी,मानव
नसे नियमनासाठी,जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधावर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्न्तीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पुर्वीपासुनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फ़ार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

Unknown said...

I love this poem too. And Krishnaji is my great grand uncle. Does anyone have a good English translation of Tutari?

Unknown said...

अतिशय सुंदर अशी कविता.. माझ्या लहानपणी मला अभ्यासक्रमास होती.. आम्ही अगदी ताला सुरात म्हणायचो.. तसा शिक्षक वर्ग आमच्याकडून म्हणून घ्यायचा.. आजही मला आठवते.. आणि आजही मी गुणगुणते..

Naresh said...

Can anyone download few poems of Anil
Udhya tuzyamule jivant ajacha nirash mi

From his book perte vha

Jaya's Green by Dr.Jaya Kurhekar said...

Thank you for making this available